अमरावती शहरातून अपहरण झालेल्या ४ वर्षांच्या मुलाची नगर पोलिसांनी केली सुटका
५ धर्मांधांना अटक
नगर – अमरावती शहरातून अपहरण करून नगर शहरात आणलेल्या नयन मुकेश लुणीया या ४ वर्षीय मुलाची येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका धर्मांध महिलेसह ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील अजून एका महिलेसह ४ आरोपी पसार आहेत. हिना शाकीर शेख उपाख्य हिना अनिकेत देशपांडे (वय २५ वर्षे), अल्मश ताहीर शेख (वय १८ वर्षे), आसिफ हिनायत शेख (वय २४ वर्षे), फैरोज रसिद शेख (वय २५ वर्षे), मुसाहीब नासीर शेख (वय २१ वर्षे) अशी अटक केलेल्या धर्मांधांची नावे आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत बहुसंख्य कसे असतात ?, याचा अभ्यास पोलीस करणार का ? – संपादक)
१७ फेब्रुवारी या दिवशी अमरावती शहरातून नयन आजीसमवेत जात असतांना दुचाकीवरून आलेल्या २ धर्मांधांनी त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर अमरावती येथील राजावाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. नयन याचे नेमके कशासाठी अपहरण करण्यात आले याविषयी उलगडा झालेला नसला, तरी खंडणीसाठी त्याचे अपहरण झाले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. कह्यात घेण्यात आलेली महिला हिना ही या अपहरण प्रकरणाची ‘मास्टरमाईंड’ आहे, असे पोलिसांनी सांगितले.