पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार ! – तृप्ती देसाई
परळी वैजनाथ (जिल्हा बीड) – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. तसेच पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी २० फेब्रुवारी या दिवशी पूजा चव्हाण यांच्या घरी भेट दिली.