महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून संगीताच्या संदर्भात आतापर्यंत करण्यात आलेले विविध प्रयोग
नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ कलांमधील गायन, वादन, नृत्य आणि नाट्य (अभिनय) या कलांतील आध्यात्मिक पैलूंचा, तसेच भारतीय कलांमधील सात्त्विकतेचा अभ्यास आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात येत आहे. या अंतर्गत भारतीय गायन, वादन, नृत्य, नाट्य, तसेच पाश्चात्त्य गायन, वादन, नृत्य अन् नाट्य यांचा तुलनात्मक अभ्यासही केला जात आहे. ‘भारतीय संगीताचा व्यक्ती, प्राणी आणि वातावरण यांच्यावर काय परिणाम होतो ?’, याविषयी ६०० हून अधिक विविध प्रयोग करण्यात आले असून अजूनही ही शृंखला चालू आहे.
या प्रयोगांसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येत आहे. या उपकरणाद्वारे ‘प्रयोगांमध्ये सहभागी घटकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावळींवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात येत आहे. हे सर्व प्रयोग भारतीय आणि विदेशी साधक यांच्यावर एकत्रित अन् वेगवेगळेही करण्यात आले आहेत. या वेळी लक्षात आलेली विशेष गोष्ट, म्हणजे भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा जो परिणाम भारतीय साधकांवर जाणवला, तोच परिणाम विदेशी साधकांवरही जाणवला.
अशा प्रकारचे आध्यात्मिक संशोधन हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या विषयांवर आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची सूची खाली दिली आहे. या विषयांमध्ये संशोधनाची आवड असलेल्यांनी contact4mav@gmail.com या इमेल पत्त्यावर संपर्क साधून या संशोधन कार्यात आपले योगदान द्यावे.
संगीताच्या संदर्भात आतापर्यंत केलेले विविध प्रयोग
टीप १ : विविध राग विविध रोगांवर उपायात्मक असल्याचे कळल्यावर ते राग पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ऐकवले.
टीप २ : श्री. प्रदीप चिटणीस यांनी विविध रोगांवर उपचारार्थ विविध रागांचा अभ्यास केला आहे. ते राग त्यांनी या वेळी गायन केले.
वादनाचे प्रयोग
वाद्यांचा क्रम संगीताच्या अनुसार आरंभी सुषिर म्हणजे वायूशी संबंधीत वाद्ये, त्यानंतर तंतु वाद्ये, त्यानंतर चर्मवाद्ये आणि शेवटी घनवाद्ये असा क्रम घेतला आहे.
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.