कन्हैयाकुमारच्या सभेस पोलिसांनी अनुमती नाकारली
कोल्हापूर – ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने २० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता दसरा चौक येथे कन्हैयाकुमार याच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी या सभेस अनुमती नाकारली आहे. आयोजकांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत सभा होणार, असे काही वृत्तपत्र प्रतिनिधींना सांगितले आहे.