२१ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णामाई उत्सव ! – ओंकार शुक्ल, संयोजक
मिरज, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – मिरज येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर २१ फेब्रुवारी या दिवशी कृष्णामाई उत्सव होणार आहे. कृष्णा नदी ही महानदी म्हणून ओळखली जाते. हिंदु धर्मातील अनेक ग्रंथांत तिचा उल्लेख आढळतो. कृष्णा नदीचा उत्सव महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यात केला जातो; मात्र मिरज शहरात तो होत नव्हता. गतवर्षीपासून या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती या उत्सवाचे संयोजक श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली.
श्री. ओंकार शुक्ल पुढे म्हणाले, २१ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता अंबाबाई मंदिर येथून पालखी मिरवणूक निघेल. सकाळी १० वाजता कृष्णा घाट येथे मूर्तीची स्थापना होईल. सायंकाळी ५ वाजता श्री राम कृपा भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी ५.३० वाजता डॉ. मनोज पाटील यांचे पर्यावरणविषयक व्याख्यान, रात्री ७ वाजता आरती-मंत्रपुष्प यांसह अन्य काही कार्यक्रम होतील. तरी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे.