१८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढलले, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारत सील करणार
मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला असून १८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये कोरोनाचे ७३६ रुग्ण आढळले आहेत, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर ४१७ इतका आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी कोरोनाचे मुंबईतील ४७३ रुग्ण बरे झाले आहेत.
गृहविलगीकरण, लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन यांविषयीचे नियम मोडणार्यांवर गुन्हे नोंद होणार ! – मुंबई महानगरपालिका
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता घरी विलगीकरणात रहाणार्यांच्या हातावर शिक्के मारावेत. घरी विलगीकरणात असणारे, लग्न समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजक यांनी कोरोनाविषयीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद होतील. मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्या ३०० मार्शल्स नेमावेत. मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करावी.