केरळमधून पुण्यात येणार्या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य !
पुणे – येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महानगरपालिकेने १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध वाढवले आहेत. पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणार्या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य केली आहे. या संदर्भात महापालिका कार्यालयातून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांची ही चाचणी निगेटीव्ह आहे, त्यांना त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याची अनुमती असेल, तर इतरांना प्रक्रियेनुसार अलगीकरणात अथवा विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल.
राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आगमनाच्या अगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल. पी.एम्.सी. आयुक्त विक्रम कुमार यांनी या निर्बंधाशी संबंधित आदेश जारी केले आहेत.