इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना
कोल्हापूर, १८ फेब्रुवारी – शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे. महापालिकेत कोणत्या मंत्र्याच्या आदेशाने मतदार सूचीत घोळ घातला जात आहे ? प्रभाग क्रमांक ४७ मधील फिरंगाई येथील इतर प्रभागांत गेलेली सर्व नावे ४ दिवसांत समाविष्ट न केल्यास कोल्हापूर महापालिकेस घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने ६०० ते १ सहस्र मतदारांचा घोळ केला आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. असा गैरकारभार करणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्यात यावे. प्रभागात विकासकामे करायची आणि दुसर्या प्रभागातील मतदारांची नावे आमच्या आणि आमच्या प्रभागातील नावे वेगळ्या प्रभागात घालायची हे धक्कादायक आहे. प्रभागात योग्य नावे घालणे हे दायित्व महापालिका प्रशासनाचे आहे.