पुणे जिल्ह्यात संचारबंदी नाही, तर जमावबंदीचे आदेश लागू ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत; मात्र संचारबंदी नाही. राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक कारवाई चालू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी राज्यातील अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांची बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.