हावडा (बंगाल) येथे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करणार्या धर्मांधाला अटक
मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; मात्र हिंदूंच्या देवतांच्या संदर्भात ही घटना घडल्याने पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, राजकीय पक्ष सारे शांत आहेत, हे लक्षात घ्या !
हावडा (बंगाल) – डोमजूर शहरात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जलाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. वसंत पंचमीच्या दुसर्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी या दिवशी जलाल याने येथील कटलिया बाजारात स्थापन करण्यात आलेल्या या मूर्तीची तोडफोड केली.
बंगाल: माँ सरस्वती की मूर्ति तोड़ने वाला जलाल गिरफ्तार, सड़कों पर हिन्दुओं ने की नारेबाजी, भारी पुलिस बल तैनातhttps://t.co/zxRZgKAKgV
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 18, 2021
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी निदर्शने करत रस्ताबंद आंदोलनही केले.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)