तीळगूळ घ्या गोड गोड बोला ना ।
तीळगूळ घ्या गोड गोड बोला ना ।
दोन शब्द ऐकून तुम्ही घ्या ना ॥ १ ॥
जीवनात हवा शाश्वत आनंद ।
तर असावा साधनेचा छंद ॥ २ ॥
दूर करण्या काळजीचा कंद ।
धरावा दोष-निर्मूलनाचा छंद ॥ ३ ॥
पिडले तुम्हा प्रारब्धाने ।
होई ते सुसह्य नामाने ॥ ४ ॥
करा प्रयत्न श्रद्धेने ।
अनुभूती येतील त्वरेने ॥ ५ ॥
हवा गुरुकृपेचा ओघ अखंड ।
भाववृद्धीच्या प्रयत्नांत पडो ना खंड ॥ ६ ॥
मोक्षप्राप्ती हेच ध्येय या जीवनी ।
बाकी सर्व तुच्छ या अवनी ॥ ७ ॥
तीळगूळ घ्या गोड गोड बोला ना ।
दोन शब्द हे तुम्ही कृतीत आणा ना ॥ ८ ॥
परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण !’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१.२०२१)