वाई (जिल्हा सातारा) येथून २९ किलो गांजा शासनाधीन
२ विदेशी नागरिक आणि गांजासह ८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – वाई (जिल्हा सातारा) येथील नंदनवन वसाहतीमधील एका बंगल्यामध्ये गांजाची शेती केली जात होती. पोलिसांंनी या बंगल्यावर धाड टाकली. त्यांना तिथे २९ किलो गांजा आणि २ जर्मन नागरिक आढळून आले. पोलिसांनी अनुमाने ८ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले की, बंगल्यात ३००-४०० छोटी-मोठी रोपे आढळून आली. ही रोपे गांजाची असल्याचे सिद्ध झाले आहे. हे नागरिक दीड वर्ष बंगल्यात रहात आहेत; मात्र ३-४ मासानंतर एकदाच ते बाहेर पडत होते. त्यामुळे ते स्थानिकांना अपरिचित होते.