सातारा येथील शासकीय निवासस्थानातील घरांची दारे, खिडक्या आणि चौकटी यांची चोरी
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील कृष्णानगर परिसरातील असलेल्या कडा वसाहतीमधील धोम कालवा जलसंपदाविभाग कार्यालय, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीचे; परंतु उपयोगात नसलेली शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांची दारे, खिडक्या, चौकटी आणि लोखंडी पाईप आदी साहित्याची चोरी झाली आहे. १ लाख ५ सहस्र ३०० रुपयांचे साहित्य असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. ही घटना २२ डिसेंबर २०२० ते १२ फेब्रुवारी २०२१ या काळात घडली. याविषयी डॉ. संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. (शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ? – संपादक)