स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच एका महिलेला मिळणार फाशी !

प्रियाकरासमवेत शबनमने केली होती घरातील ८ जणांची हत्या !

महिला शबनम

मथुरा (उत्तरप्रदेश) राज्यातील अमरोहा येथील महिला शबनम हिने प्रियकर सलिम याच्यासमवेत मिळून एप्रिल २००८ मध्ये स्वतःच्याच घरातील ७ जणांची कुर्‍हाडीने हत्या केल्याच्या प्रकरणी तिला मथुरा कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तिच्यासमवेत सलीम यालाही फाशी देण्यात येणार आहे. घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने शबनमने त्यांची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर महिला कैद्याला फाशी देण्याची ही पहिलीच घटना असणार आहे. देशात केवळ मथुरेच्या कारागृहातील ‘फाशी घरा’तच महिलेला फाशी दिली जाऊ शकते. १५० वर्षांआधी हे ‘फाशी घर’ बनवण्यात आले होते.