सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण
|
सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे ‘बडी संगत’चे महंत मुनि बजरंग दास यांच्यावर धर्मांधांनी चाकूद्वारे केलेल्या आक्रमणामध्ये ते गंभीररित्या घायळ झाल्याची घटना १६ फेब्रुवारीला घडली. त्यांना लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येथील बागेमध्ये औषधाची फवारणी करण्यास महंत मुनि बजरंग दास यांनी केलेल्या विरोधातून हे आक्रमण करण्यात आले. यात येथील ४ सुरक्षारक्षकही घायाळ झाले. हे कारण असले, तरी मूळ कारण भूमीचा वाद आहे.
महंत मुनि बजरंग दास पर चाकूओं से ताबड़तोड़ हमलाhttps://t.co/RiZwmOtBRR
— News18 Uttar Pradesh (@News18UP) February 16, 2021
#सीतापुर-थाना खैराबाद क्षेत्र में हुई घटना के सम्बन्ध में उदासीन अखाड़ा के महन्त श्री धर्मेन्द्र दास जी की शान्ति अपील के सम्बन्ध में दी गई बाइट। @Uppolice @dgpup @adgzonelucknow @Igrangelucknow pic.twitter.com/ZnHB30Ww9K
— sitapur police (@sitapurpolice) February 16, 2021
या बागेच्या जागेवरून वाद चालू आहे. महंत यांनी अवैध नियंत्रणातून काही एकर भूमी मुक्त करवून घेतली होती. यामुळे त्यांना पोलिसांनी एका सशस्त्र पोलिसाचे संरक्षणही दिले होते. (असले संरक्षण किती कूचकामी होते, हे यातून दिसून येते ! – संपादक) पोलीस आरोपी लईक खान, त्याचा भाऊ सलमान आणि अतीक यांच्यासह अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक हिंदु आणि मुसलमान यांची शांतता बैठकही आयोजित केली होती. (अशा बैठकांचा धर्मांधांवर काहीच परिणाम होत नाही आणि हिंदूंचा बळी जात रहातो. त्यामुळे अशा शांतता बैठका आयोजित करण्याऐवजी प्रशासनाने धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक)