पाकिस्तान आणि बांगलादेश येथे सत्ता स्थापन करून दाखवा, तुमचे स्वागत करू !
उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान !
मुंबई – ‘नेपाळ आणि श्रीलंका येथे सत्ता स्थापन करणार’, असे म्हणतात. धारिष्ट्य असेल, तर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचे स्वागत करू, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदार यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.
पाकिस्तान अन् बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा; उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपाला आव्हान https://t.co/mdhvx7DBAQ @BJP4Maharashtra @NiteshNRane @meNeeleshNRane @BhatkhalkarA
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत; पण आपल्याला तसे करायचे नाही. बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आला आहे. पाकिस्तानमध्ये भगवा फडकवा, आम्हाला आनंद होईल. दुसर्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती; पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले. नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती; पण भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल.’’