आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू
नवी देहली – आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा इबोला विषाणूचा फैलाव झाला आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.