चेंबूर (मुंबई) येथे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ, प्रभागात पुन्हा दळणवळण बंदी लागू !

मुंबई – मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे चेंबूरमधील ‘एम् पश्‍चिम’ प्रभागात मागील आठवड्यात दिवसाला सरासरी १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र या आठवड्यात ही संख्या २५ पर्यंत पोचली आहे. त्यामुळे या प्रभागात महानगरपालिकेने दळणवळण बंदी लागू केली आहे. या प्रभागातील नागरिकांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

…अन्यथा आपण पुन्हा एकदा दळणवळण बंदीकडे जाऊ ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

दळणवळण बंदी लागू करायची कि नाही ?, हे सर्वस्वी नागरिकांच्याच हातात आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची गोष्ट आहे. बहुतांश लोक ‘मास्क’विना लोकल रेल्वेगाड्यांतून प्रवास करत आहेत. लोकांनी दक्षता घ्यायला हवी. अन्यथा आपण पुन्हा एकदा दळणवळण बंदीकडे जाऊ, अशी चिंता मुंबई महापालिकेच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.