पुणे येथील अधिकोषाची २ कोटी ६९ लाखांची फसवणूक करणार्या माजी नगरसेवकासह १० जणांवर गुन्हा नोंद !
असे भ्रष्ट लोकप्रतिनिधी जनतेपुढे काय आदर्श ठेवणार ?
पुणे – येथील ‘श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेड’च्या विशालनगर, पिंपळे निलख येथील शाखेत बनावट कागदपत्रे सिद्ध करून अधिकोषाची २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत घडली आहे. माजी नगरसेवक विलास नांदगुडे (अध्यक्ष), अधिकोषाच्या ३ महिला अधिकारी आणि अन्य ६ जण यांनी अधिकोषाची स्वतःच्या आर्थिक लाभासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून फसवणूक केली आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रे सिद्ध करून कर्ज आणि ठेवीत अपव्यवहार करून खोटे हिशोब नोंदवले. भगवान तुकाराम धोत्रे यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी सांगवी पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दिली आहे. (अशा भ्रष्टाचार्यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा ! तसेच पुन्हा भ्रष्टाचार होणारच नाही, अशा प्रकारे कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल. – संपादक )