पुणे येथील वृद्ध दाम्पत्याच्या घरातील लाखो रुपयांचे दागिने लुटून चोर पसार

असुरक्षित पुणे !


पुणे – येथील तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील मनोहरनगरमध्ये १३ फेब्रुवारीला पहाटे ४ जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक मूल्याचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. या प्रकरणी अर्जुन शेटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. या घटनेची नोंद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.