शेतकरी आंदोलन चालू ठेवण्यासाठी पैसा आणि मद्य पुरवा !
हरियाणातील काँग्रेसच्या महिला नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
अशा प्रकारची विधाने केवळ काँग्रेस नेत्यांकडूनच होऊ शकतात ! शेतकर्यांचे आंदोलन प्रायोजित आहे, असे आरोप आधीपासून होत असतांना ते सत्य आहेत, असेच यातून स्पष्ट होते !
जींद (हरियाणा) – शेतकरी आंदोलन चालू ठेवण्यासाठी पैसा, भाज्या, तूप आणि मद्य पुरवा, असे वक्तव्य येथील काँग्रेसच्या महिला नेत्या विद्यादेवी यांनी केले आहे. त्या येथे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या.
कांग्रेस नेता विद्या रानी ने कहा ”कांग्रेस का अस्तित्व खत्म हो चुका है, अब किसान आंदोलन के सहारे पार्टी को मजबूत करना है। गांवों में कांग्रेस को ठीक स्थिति में लाकर यात्रा निकालनी है, आंदोलनकारियों की पैसे, अनाज, शराब से मदद करनी है@INCIndia @INCUttarPradesh @priyankagandhi pic.twitter.com/Vuvsdo5LzX
— Newsroom Post (@NewsroomPostCom) February 15, 2021
बैठकीच्या कार्यक्रमाचे प्रसारमाध्यमांकडून चित्रीकरण चालू असल्याचे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी विद्यादेवी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण विद्यादेवी यांनी त्यांचे भाषण चालूच ठेवले.