पुण्यात ५ वर्षांच्या मुलीवर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाकडून अत्याचार !
समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. समाजाची दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !
पुणे – येथील विमाननगर भागात दिलीपकुमार गोस्वामी या हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील एका लेबर कॅम्पमध्ये रहातात. मुलीचे आई-वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने तिला घराबाहेर बोलावून घेतले. आरोपी ज्या हॉटेलमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतो, त्याच्या बाजूला असलेल्या वाहन तळाच्या जागेवर नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.