रिंकू शर्मा यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १६ फेब्रुवारी (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिल्यानंतर त्या हेतूने निर्माण झालेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशभर निधी समर्पण अभियान चालू झाले. या संदर्भात देहली शहरातील मंगोलपुरी भागातील बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची जिहादी धर्मांधांनी हत्या केली. या प्रकरणी रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन दिले.
या वेळी बजरंग दलाचे संयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री रणजित पवार, मुकुंद उरुणकर, दत्तात्रय पाटील, प्रवीण सामंत, सनतकुमार दायमा, रमेश खंडेलवाल यांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.