गोध्रा दंगलीतील मुख्य आरोपी रफीक हुसेन याला १९ वर्षांनंतर अटक
|
कर्णावती (गुजरात) – वर्ष २००२ मध्ये राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साबरमती एक्सप्रेस गाडीच्या कारसेवक असलेल्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणात पसार असणारा मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक या आरोपीला पोलिसांनी १९ वर्षांनंतर गोध्रा शहरातूनच अटक केली आहे.
तब्बल १९ वर्षांनंतर सापळा रचून गोध्रा कांडातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. #Gujarat https://t.co/qgysircuL7
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
स्वतःच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रफीक गोध्रा येथे आला असता त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. घटनेच्या काळात रफीक गोध्रा रेल्वे स्थानकावर कामगार म्हणून काम करत होता.