बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक यांचे ६ मासांत खासगीकरण होणार !
सरकार मंदिरांचे सरकारीकरण करते, तर सरकारी बँकांचे खासगीकरण करते, हे लक्षात घ्या आणि मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यास सरकारला भाग पाडा !
नवी देहली – केंद्र सरकारने पुढील ६ मासांत देशातील बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. सरकारने अर्थसंकल्पात २ सरकारी बँकांचे भागभांडवल विकणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वीची सरकारे सरकारी बँकांना खासगी बँक बनवण्यापासून टाळत होते; कारण यामध्ये लाखो कर्मचार्यांच्या नोकरीला धोका होता; मात्र आताच्या सरकारने बँकांचे खासगीकरण झाल्यास ‘कर्मचार्यांच्या नोकर्या जाणार नाहीत’, असे स्पष्ट केले आहे.
Bank of India, three other public sector banks shortlisted for privatisationhttps://t.co/tTam9luajs
— Business Today (@BT_India) February 15, 2021