विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणाची नियमानुसार अन्वेषण होईल. या प्रकरणातील सत्य महाराष्ट्राला माहीत होईल. विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. पूजा चव्हाण आत्महत्येविषयी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. पत्रकारांनी ‘संजय राठोड कुठे आहेत ?’ असा प्रश्न विचारला असता ‘ते कुठे आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.