पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
पुणे – नवनाथ थोरात यांच्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे; मात्र हा गुन्हा खोटा असल्याचे नवनाथ यांचे म्हणणे होते. याची माहिती देण्यासाठी ते ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी आले. तेथे त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हालवले. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.