पुणे येथे वृद्धांच्या घरात लाखो रुपयांची चोरी
पुणे – येथील तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील मनोहरनगरमध्ये १३ फेब्रुवारीला पहाटे ४ जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक मूल्याचा ऐवज चोरला. (असुरक्षित पुणे ! – संपादक)