अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाचे केत-कावळे (जिल्हा नगर) येथे २ दिवसांचे अधिवेशन !
नगर – जैन श्वेतांबर गुजराती समाजाची राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेली संस्था अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणी समिती सदस्यांचे प्रथमच २ दिवसांचे राष्ट्रीय महाअधिवेशन सेजल वर्ल्ड, केत-कावळे येथे नुकतेच झाले. या कार्यक्रमास राज्यातील विविध भागातून १२५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व कार्यकारी सदस्यांना पद नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच गुजराती समाज महासंघाचा ‘लोगो’ आणि फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी ‘समाज संघटनचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. विविध समिती प्रमुख आणि उपप्रमुख यांनी आपल्या कार्याची माहिती दिली. समाजातील प्रश्नावर अनेक सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात समिती सदस्य धीरज शहा, जय शहा, अजय शहा, यश शहा, तेजपाल शहा, गिरीश शहा आदी उपस्थित होते.