माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन !
पुणे – माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी.बी. सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.
पी.बी. सावंत यांनी मुंबई विद्यापिठातून कायद्याची पदवी (एल्.एल्.बी.) घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. पी.बी. सावंत वर्ष १९८९ ते १९९५ या काळात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. वर्ष १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. पुण्यातील पहिली एल्गार परिषद ही पी.बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.