पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर
कुडाळ – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे (कोल्हापूर) अध्यक्ष महेश जाधव आणि समितीचे सर्व सदस्य १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग दौर्यावर येणार आहेत.
या दौर्यात महेश जाधव आणि सदस्य हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली येणार्या जिल्ह्यातील देवस्थानांना भेटी देणार आहेत. या वेळी समितीने आर्थिक साहाय्य केलेल्या मंदिर बांधकामांची पहाणी, तसेच स्थानिक देवस्थान समित्यांना कामकाज करत असतांना येणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या दौर्याच्या अंतर्गत १६ फेब्रुवारीला सांगेली, वाफोली, बांदा देवस्थानांना भेटी, दुपारी ३ वाजता बांदा येथील श्री बांदेश्वर मंदिर सभागृहात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील देवस्थानांच्या स्थानिक सल्लागार समितीच्या पदाधिकार्यांसह मार्गदर्शन सभा होणार आहे. १७ फेब्रुवारीला तुळस, तळवडे, नेमळे येथील देवस्थानांना भेटी, दुपारी ३ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी या तालुक्यांतील देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्यांसह मार्गदर्शन बैठक होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर नेरूर, वालावल, चेंदवण येथील देवस्थानांना भेटी आणि १८ फेब्रुवारीला सकाळी माणगांव, डिगस, कुर्ली, आचिर्णे येथील देवस्थानांना भेटी देणार आहेत.
या दौर्यात ज्या समित्यांना महेश जाधव यांना भेटायचे असेल, त्यांनी ९४२१२३८२०५, ७७२०९३४३०५ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य चारुदत्त देसाई यांनी केले आहे.