मुंबई पोलिसांची भिकार्यांना पकडण्याची मोहीम
|
मुंबई – येथे पोलिसांकडून भिकार्यांना पकडण्याची मोहीम राबवण्यास आरंभ करण्यात आला आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. भिकार्यांना पकडून त्यांना चेंबूर येथील स्वीकार केंद्रात ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत दिवसेंदिवस भिकार्यांची संख्या वाढत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे मागितले जातात. मुलांचीही मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करून पैसे मागितले जातात.