श्री शिवशंभू जागर समिती आणि समस्त पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने ‘देहली विजयदिन सोहळा’ साजरा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी – पानीपतच्या युद्धानंतर १० फेब्रुवारी १७७१ या दिवशी देहलीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांनी भगवा ध्वज फडकावला. या घटनेला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या  निमित्ताने पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने ‘देहली विजयदिन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती महादजी शिंदे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक श्री. ब.हि. चिंचवडे यांचे ‘मराठ्यांचा देहली दिग्विजय’ या विषयावर मार्गदर्शन झाले. त्यांनी तरुणांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचे आवाहनही केले. या कार्यक्रमात शिवप्रेमी सहभागी झाले होते. समितीचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर यांनी सोहळ्यासाठी सहकार्य केले.