शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकार्यांची नेमणूक नियमबाह्य ! – औरंगाबाद खंडपिठाचा आदेश
नगर – साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून राज्य सरकारने त्याविषयीचे शपथपत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी या दिवशी होईल.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार आय.ए.एस्. झालेल्या अधिकार्यांची या पदावर नियुक्ती करणे आवश्यक आहे; मात्र बगाटे यांची ज्या दिवशी नियुक्ती झाली, त्या दिवशी ते आय.ए.एस्. नव्हते. हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाचा अवमान होतो. त्यामळे सरळ आय.ए.एस्. अधिकार्याची या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.