पालटत्या काळाचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या भावविश्वात सुंदर चित्र उभे करत त्यांचे प्रबोधन करणारे अभिनंदनीय आणि वंदनीय ‘बालसंस्कार वर्ग’ !
प्राध्यापक श्रीकांत बेलसरे हे मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. शंभराव्या बालसंस्कार वर्गात याचे आतापर्यंत १०० भाग झाल्याच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.
१. पालटत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लहान मुलांचे प्रबोधन करणारा अभिनंदनीय कार्यक्रम !
भारतात (हिंदुस्थानात) रात्रं-दिवस अनेक वाहिन्यांवरून विविध कार्यक्रम दाखवले जात असतांना सचोटी, संयम, विश्वास आणि गुरुकृपा यांच्या बळावर पालटत्या काळाचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानावर आरूढ होऊन ‘मुलांना माहिती देणे आणि त्यांचे प्रबोधन करणे’, हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे !
२. आध्यात्मिक अधिष्ठान असलेला आणि तरीही वाढती दर्शक संख्या असलेला वंदनीय कार्यक्रम !
‘दृकश्राव्य माध्यमातून मुलांच्या भावविश्वात चित्र उभे करणे’, हे केवळ अभिनंदनीय नाही, तर वंदनीय आहे ! खरेतर हा कार्यक्रम वैचारिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेले एक अनुष्ठान आहे अन् ते बघणार्यांची आणि करणार्यांची संख्या न्यून होत नसून ती वाढतच आहे !
३. क्रांतीची शक्ती असलेला शंभरावा अंक !
संख्याशास्त्रानुसार एक, शून्य आणि शून्य यांच्या संयोगातून ‘शंभर’ हा अंक सिद्ध होतो. त्यातील ‘एक’ हा ‘रवि’चा अंक आहे, तर ‘शून्य’ हे ‘क्रांतीचे द्योतक’ आहे. या तीन अंकांमधून निर्माण होणार्या शंभर या अंकातील स्वतंत्रता, खंबीरता आणि सात्त्विकता यांच्या बळावर ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याची तळमळ अतिशय स्पृहणीय अन् वंदनीय आहे !
४. ‘केवळ लहान मुलांनीच नाही, तर मोठ्यांनीही त्यापासून आदर्श बोध घ्यावा’, असा हा भावप्रयोग अतिशय वंदनीय आणि पूजनीय आहे !
५. बालसंस्कार वर्ग घेणार्या सौ. गौरी कुलकर्णी यांनी मुलांशी साधलेली जवळीक !
‘सौ. गौरी कुलकर्णी ‘ऑनलाईन’ (स्क्रीनवर) बोलत नसून प्रत्यक्षात आपल्यासमोर येऊन बोलत आहेत आणि त्या आपल्या कुटुंबातीलच आपली ताई किंवा मावशी आहे’, असे मुलांना वाटू लागले आहे.
या बालसंस्कार वर्गासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला काही ठिकाणांहून शब्द सापडले, त्यांचे साहाय्य घेतले. परमेश्वरानेही मला काही शब्द सुचवले. त्यासाठी परमेश्वराचे जेवढे उपकार मानावे, तेवढे अल्पच आहेत.’
– श्री. श्रीकांत बेलसरे आणि सौ. कविता श्रीकांत बेलसरे, पुणे (ऑक्टोबर २०२०)