इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म ! – कुवेतची गायिका इब्तिसाम हामिद
इस्लामचा त्याग करून स्वीकारला ज्यू धर्म !
कुवेत – येथील गायिका इब्तिसाम हामिद यांनी इस्लामचा त्याग करून ज्यू धर्म स्वीकारला आहे. यामुळे त्यांचा विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत हामिद यांनी म्हटले, ‘ज्यू धर्म महिलांविषयी अधिक सहिष्णु आहे. त्यामुळे मी तो स्वीकारत आहे. मी स्वच्छेने इस्लामचा त्याग करत आहे. इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म आहे. तो महिलांची घृणा करतो. त्यांना दाबतो आणि त्यांच्यासमवेत हिंसा करतो. इस्लाम कधी महिलांना त्यांचा संपूर्ण अधिकार देत नाही. यासाठी मी गर्वाने सांगते की, मी आता ज्यू आहे.’ हामिद यांनी वर्ष २०१८ मध्ये म्हटले होते, ‘इस्लाममध्ये संगीत हराम.’
“Islam is a religion of terror and hypocrisy”, says Muslim Kuwaiti singer Ibtisam Hamid after converting to Judaismhttps://t.co/4WzUV7eE4D
— OpIndia.com (@OpIndia_com) February 14, 2021
१. इब्तिसाम हामिद यांनी कुवेतमधील सत्ताधारी राजकीय पक्ष अल् सबह याच्यावर इस्रायलसमवेत संबंध बिघडवण्याचा आरोप केला आहे. हामिद यांनी म्हटले की, अल् सबह पक्षाने इस्रायलसमवेतचे संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न केला नाही. हा पक्ष धार्मिक आणि वैचारिक स्वातंत्र्य नाकारतो. माझा या पक्षाशी कोणताही संबंध नाही आणि मी त्याचे समर्थनही करत नाही.
२. कुवेतच्या प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे की, इब्तिसाम हामिद मूळच्या कुवेतच्या नाहीत. त्यांची आई कुवेती आहे; मात्र कोणत्याही कुवेती महिलेच्या मुलांना कुवेतचे नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही. हामिद यांनी केलेला नागरिकत्वाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. हामिद इराकच्या नागरिक आहेत.