भंडारा येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक
|
भंडारा – जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तहसीलदार निवृत्ती जगद उइके (वय ५५ वर्षे) यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० फेब्रुवारी या दिवशी अटक केली. विशेष म्हणजे ५ वर्षांपूर्वी एका प्रकरणात लाच घेतांना तहसीलदार उइके यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. २ फेब्रुवारी या दिवशी आरोपी तहसीलदार उइके यांनी तालुक्यातील धर्मापुरीच्या रेतीघाटावरून रेतीची चोरटी वाहतूक करतांना तक्रारदाराला रंगेहात पकडून पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. त्या वेळी उइके यांनी तक्रारदाराला दूरभाष करून यापुढे रेतीची चोरटी वाहतूक करावयाची असल्यास प्रतिमाह १० सहस्र रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती.