कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी कारवाईस प्रारंभ !
जनतेने स्वयंशिस्त न पाळल्याचा परिणाम !
कोल्हापूर – येथील बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे. १ घंट्याच्या कालावधीत ५० हून अधिक खोकी, केबिन्स महापालिकेने जप्त केली. दुकानांच्या बाहेर आलेल्या छपरांवरही हातोडा मारण्यात आला. महापालिकेने खोकी उचलण्यास आरंभ करताच अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे, खोकी, केबिन्स काढून घेतली. फेरीवाल्यांना गत ८ दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी ऐकले नसल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रशासनाने थेट खोकी उचलून नेली.