‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे एका दिवसाचे वैचारिक धर्मांतर ! – सौ. वेदिका पालन
हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ जागृती बैठक
डिचोली, १३ फेब्रुवारी – आज आपण आपली महान भारतीय हिंदु संस्कृती विसरत चालल्याने आजची युवा पिढी ‘डे’ सारखी कुप्रथा साजरी करतांना दिसते. यामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सर्वांत मोठा दिवस आहे. या दिवशी राष्ट्रद्रोही व्हॅलेंटाईनला त्याच्या राष्ट्रद्रोही कृत्याविषयी फाशी देण्यात आली होती. हा दिवस साजरा करून आपण एका दिवसाचे वैचारिक धर्मांतर करत असतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महाविद्यालयीन युवती, युवक आणि धर्मप्रेमी यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सौ. वेदिका पालन मार्गदर्शन करत होत्या.
मार्गदर्शनात त्या पुढे म्हणाल्या, ‘‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भेटवस्तूंची विक्री होत असते आणि विदेशी आस्थापने त्याचा लाभ उठवतात. यासाठी देशाची आर्थिक हानी करणार्या आणि संस्कृतीचेही हनन करणार्या या ‘डे’वर सर्वांनी बहिष्कार घातला पाहिजे. बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश महाविद्यालयीन युवतींनी बैठकीत मांडलेल्या विषयामुळे प्रभावित होऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ या कुप्रथेविषयी त्यांच्या महाविद्यालयात जागृती करणार असल्याचे सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन कु. प्रचीती गावणेकर आणि कु. माऊली शिरोडकर यांनी केले, तर बैठकीचा उद्देश कु. अवनि छत्रे यांनी सांगितला. कु. ऐश्वर्या शिरोडकर यांनी बैठकीत जोडलेल्या युवकांशी त्यांच्या प्रतिक्रियांविषयी संवाद साधला. बैठकीची सांगता कु. माऊली शिरोडकर यांनी दिलेल्या आणि क्षात्रतेज जागवणार्या ‘हर हर महादेव’च्या घोषणेने झाली. या बैठकीचा ६० जणांनी लाभ घेतला.
क्षणचित्र – बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम महाविद्यालयीन युवतींनीच स्वत: पुढाकार घेऊन आयोजित केला होता.
ऑनलाइन बैठकीतील उपस्थितांचे अभिप्राय
‘व्हॅलेंटाईन डे’ ही कशी चुकीची प्रथा आहे, याविषयी बैठकीच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली. याविषयी मी मित्रांना सांगून त्यांचे याविषयी प्रबोधन करणार. – कु. मोहीत बोकाडे
मी माझ्या महाविद्यालयातील चर्चासत्रात (पॅनल डिस्कशन) ‘व्हॅलेंटाईन डे’ ही कशी कुप्रथा आहे’, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आजच्या बैठकीतून मला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी खूप कृतज्ञता वाटली. महाविद्यालयात मी जे काही सांगितले होते, ते योग्यच होते आणि माझ्याकडून गुरुदेवांनीच धर्मकार्य करवून घेतले, असे वाटले. – कु. प्राप्ती गावणेकर.
बैठकीतील विषयामुळे मी प्रभावित झाले आणि माझ्यात राष्ट्रप्रेम जागृत झाले. – कु. वैदेही हळदणकर
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्या !बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी श्री. कपिल फडते यांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. |