जनजागृती आणि समुपदेशन यांमुळे पुणे येथील मुलींच्या जन्मदरात वाढ !
पुणे – पी.सी.पी.एन्.डी.टी. कायद्याची प्रभावी कार्यवाही, त्याचबरोबर जनजागृती आणि समुपदेशन यांमुळे अनुमाने ५ वर्षांनंतर पुणे शहरात वर्ष २०२० मध्ये १ सहस्र मुलांमागे ९४६ मुलींचा जन्म झाला आहे. नव्या पालकांच्या बदलत्या मानसिकतेतून हे शक्य झाल्याचे पुणे महानगरपालिकेच्या साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
विवाहित महिला आणि पुरुष यांचे समुपदेशन जन्मदर वाढविण्यामागे महत्त्वाचे आहे; पण महिलेलाच मुलगा हवा असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचे मन वळवणे अधिक कठीण असल्याची खंत डॉ. बळीवंत यांनी बोलून दाखविली.