सांगली नगर वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके पुरस्कार ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला घोषित !
सांगली, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रतिवर्षी क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी सांगली नगर वाचनालयाच्या वतीने पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगली येथील ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रमाला घोषित झाला आहे. हा पुरस्कार १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात श्री. चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तरी यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सकाळी १० वाजता पुण्यतिथी साजरी होणार
येथील सांगली महापालिकेसमोरील क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये सकाळी १०.३० वाजता क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १३८ वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. तरी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके यांनी केले आहे.