‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे, ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा !
आज, १४ फेब्रुवारीला असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने…
युवक (हातात गुलाबाचे फूल घेऊन युवतीला म्हणतो) : हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !
युवती : व्हॅलेंटाईन डे ? कोण व्हॅलेंटाईन ? कुठून आला हा ? त्या व्हॅलेंटाईनचा माझ्याशी काय संबंध ?
युवक : अगं, व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेम दिवस !
युवती : प्रेम दिवस ? बघ भाऊ, नीट ऐक. आपल्याकडे भाऊ-बहिणीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे, राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी १५ ऑगस्ट अन् २६ जानेवारी आहे, परिवारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवाळी आणि दसरा असे सण आहेत. पत्नी आपल्या पतीसमवेत ७ जन्म संसार करता यावा; म्हणून ती वटपौर्णिमेचे व्रत करते.
मित्रावर प्रेम कसे करावे, हे शिकवण्यासाठी आपल्याकडे श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे उदाहरण आहे. देशावर प्रेम कसे करावे, हे शिकवण्यासाठी आपल्याकडे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांसारखे अनेक असंख्य क्रांतीकारक आपल्याकडे होऊन गेले. शत्रू कितीही क्रूर असला, तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आदर आणि प्रेम असावे, हे सांगणारे प्रभु श्रीराम अन् छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आहे. एवढे सर्व आपल्याकडे असतांना हा व्हॅलेंटाईन मधेच कुठून आणलास ? छत्रपतींच्या राज्यात मुलींच्या मागे मागे असे फूल घेऊन लागण्यापेक्षा आपले कर्तृत्व एवढे वाढवायला हवे की, प्रत्येक मुलीला वाटायला हवे, ‘मलाही हाच नवरा हवा.’ असे आपले कर्तृत्व करायला हवे, कळले का ?
युवक : हो ताई
युवती : कुठे चाललास ?
युवक : घरी
युवती : चल आपण जाऊया.
युवक : कुठे ?
युवती : ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करायला.
॥ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥
– श्री. नरेंद्र सुर्वे, देहली.