होळकरांच्या सात-बार्यावर पवार कुटुंबियांचा डोळा ! – भूषणसिंह होळकर
सांगली – होळकरांच्या सात-बार्यावर पवार कुटुंबियांचा डोळा आहे. जेजुरी परिसरात हे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत. त्यासाठी हा उद्योग चालू आहे, असा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. होळकर पुढे म्हणाले, ‘‘अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण चालू आहे. पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणार्यांच्या हस्ते होऊ नये. होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि ७० वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील.’’