‘व्हॅलेंटाईन डे’मुळे होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदने
रायगड
पनवेल – रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन देण्यात आले. तसेच खोपोली येथील पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री जनार्दन जाधव, किशोर पडवळ, शशिकांत पाटील, कुमार प्रथमेश पडवळ यांनी निवेदन दिले.
तासगाव (जिल्हा सांगली)
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी तासगाव पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी श्री. आशितोष राक्षे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन खेराडकर, श्री. सचिन कुलकर्णी, तसेच अन्य उपस्थित होते.
चोपडा आणि यावल येथे निवेदन
जळगाव – येथेही ‘हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने जिल्ह्यातील चोपडा अन् यावल येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. चोपडा येथे नायब तहसीलदार राजेश पौड यांना, तर यावल येथे नायब तहसीलदार आर्.के. पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी चोपडा येथे सर्वश्री जनादर्र्न शिंदे, दीपक ठाकरे, राजेंद्र बारी, प्रदीप माळी, राहुल बारी, महेंद्रशिंग पाटिल, किरण बारी, राजेंद्र वराडे, दिगंबर माळी, महेश माळी, सुधाकर चौधरी, यशवंत चौधरी, किशोर दुसाने, तर यावल येथे सर्वश्री चेतन भोईटे, धीरज भोळे, रोहित पाटील, कुलदीप राजपूत, विजय भंगाळे, सूरज पाटील आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.