आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना जामीन
मुंबई – आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने ५ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन संमत केला आहे. या प्रकरणी मनी लॉड्रिंगच्या विषयीही संचालनालयाकडून तपास केला जात आहे. चंदा कोचर यांच्या माध्यमातून १ सहस्र ५७५ कोटी रुपयांचे कर्ज व्हिडीओकॉन ग्रुपच्या ५ आस्थापनांना देण्यात आले होते. हे कर्ज देतांना बँकेच्या अटी आणि शर्ती यांचे उल्लंघन करण्यात आल्याचेही समोर आले होते.