हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या ‘सोशल मिडिया’ प्रसाराचा ऑगस्ट अन् सप्टेंबर २०२० मधील आढावा
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेमुळे आणि सद्गुरु अन् संत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या आपत्कालीन स्थितीमध्येही ‘सर्व जिज्ञासूंना हिंदु धर्माची महानता समजावी, त्यांना धर्मशिक्षण मिळावे आणि हिंदु धर्मावर होत असलेले आघात समाजापर्यंत पोचवता यावेत’, यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया’च्या विविध माध्यमांद्वारे व्यापक स्तरावर प्रसार करण्यात आला. दळणवळण बंदीच्या काळात या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांत झालेली ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा पुढील लेखात पाहूया.
१. ‘व्हॉट्सअॅप’ प्रणालीद्वारे झालेला प्रसार
‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून खालील सारणीप्रमाणे धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत.
या प्रणालीद्वारे नियमित धर्मशास्त्र, हिंदूंवरील आघातांच्या वार्ता, तसेच सण, धार्मिक उत्सव यांमागील धर्मशास्त्र दर्शवणारी चलत्चित्रे पाठवली जातात. या अंतर्गत सध्या ‘जागो हिंदू’ या ‘व्हॉट्सअॅप’ गटांच्या माध्यमातून धर्मशिक्षण आणि हिंदूंवर होणारे आघात यांविषयी देण्यात येणारी माहिती प्रतिदिन ६ लक्ष ८४ सहस्र ६४६ धर्माभिमानी हिंदूंपर्यंत पोचत आहे. हा प्रसार भारतातील विविध (मराठी, इंग्रजी, कन्नड अशा) भाषांमध्ये केला जातो.
१ अ. फलनिष्पत्ती : गुरुदेवांच्या कृपेने ‘व्हॉट्सअॅप’ प्रणालीद्वारे घरबसल्या काही मिनिटांच्या प्रसारानेच चांगली फलनिष्पत्ती मिळत आहे. अनेक जणांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर अनेक जणांनी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांची मागणी केली आहे.
२. ‘फेसबूक’ प्रणालीद्वारे झालेला प्रसार
सध्या ‘फेसबूक’च्या माध्यमातून पुढील सारणीप्रमाणे धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदू अधिवेशन (Hindu Adhiveshan)’ या ‘फेसबूक’ पानाची सदस्यसंख्या आता १४ लक्ष ४८ सहस्र ९२८ पर्यंत पोचली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदू अधिवेशनाचे ‘फेसबूक’ पान, सनातन संस्थेचे ‘फेसबूक’ पान आणि जिल्हा स्तरीय ‘फेसबूक’ पान यांच्या माध्यमातून ऑगस्ट अन् सप्टेंबर २०२० मध्ये ‘किती लोकांपर्यंत विषय पोचला ?’, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.
२ अ. ‘ऑनलाईन’ घेतलेल्या ‘विशेष चर्चासत्रां’च्या थेट प्रक्षेपणांना (लाईव्ह) मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ३०.७.२०२० ते २.८.२०२० आणि ६.८.२०२० ते ९.८.२०२० या कालावधीत घेतले गेले. या अधिवेशनाचा अनेक धर्मप्रेमींनी लाभ घेतला. त्यानंतर घेतलेले विशेष कार्यक्रम पुढील सारणीत दिले आहेत.
‘फेसबूक’ची दडपशाही !
१. कुठलीही पूर्वकल्पना न देता ‘फेसबूक’ने सनातन संस्थेचे ‘फेसबूक’ पान बंद करणे : ‘३.९.२०२० या रात्री ११ वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता ‘फेसबूक’ने सनातन संस्थेचे ‘फेसबूक पेज’ बंद केले. सनातन संस्थेच्या ‘फेसबूक’ पानाच्या माध्यमातून नियमितपणे धर्मशिक्षणाच्या आणि अध्यात्मज्ञानाविषयीच्या ‘पोस्ट’ केल्या जात होत्या. सर्वांना आवश्यक असणार्या या ‘पोस्ट’चा प्रसार ‘फेसबूक’च्या दडपशाहीमुळे बंद झाला आहे. याविषयी सनातन संस्थेच्या वतीने योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
२. सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनाही अशाच प्रकारचा अनुभव येणे आणि त्याचा विरोध करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचे सर्वांनी ठरवणे : याविषयी घेतलेल्या विशेष चर्चासत्राच्या माध्यमातून याचा निषेध नोंदवला गेला आणि ‘फेसबूक’च्या या दडपशाहीची सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘हिंदुत्वाचे कार्य करत असतांना त्यांनाही ‘फेसबूक’कडून ‘पेज’ बंद करणे, ‘पोस्ट’ करण्यास निर्बंध लादणे, कुठलीही पूर्वकल्पना न देता ‘पोस्ट’ ‘पेज’वरून काढून टाकणे’, असे अनुभव येत आहेत’, असे अभिप्राय अनेक जणांनी दिले. याविषयी सर्वांनी संघटित विरोध करण्याचे ठरवले आहे.
३. ‘टि्वटर’ प्रणालीद्वारे झालेला धर्मप्रसार
सध्या ‘टि्वटर’च्या माध्यमातून पुढील सारणीप्रमाणे धर्माभिमानी नियमितपणे प्रसार करत आहेत.
‘हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘टि्वटर’ खात्यामधून (@HinduJagrutiorg), सनातन संस्थेच्या अधिकृत ‘टि्वटर’ खात्यामधून (@SanatanSanstha), तसेच धर्माभिमान्यांकडून झालेल्या प्रयत्नांमधून ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० मध्ये किती लोकांपर्यंत विषय पोचला ?’, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.
या २ मासांत हिंदु धर्मावर होणार्या आघातांना विरोध करण्यासाठी आणि राष्ट्रविरोधी घटनांचा विरोध दर्शवण्यासाठी ‘टि्वटर’वर विविध ‘ट्रेंड’ घेण्यात आले. त्याला समाजातूनही पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला. ‘टि्वटर’वर घेण्यात आलेल्या बहुतांश ‘ट्रेंड’ना राष्ट्रीय ‘ट्रेंड’मध्ये स्थान मिळाले. त्यामुळे या सर्व विषयांचा प्रसार राष्ट्रीय स्तरावरून झाला. ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून झालेल्या प्रसाराविषयीचा लेख लवकरच प्रसिद्ध करत आहोत.’
– श्री. प्रदीप वाडकर (१७.११.२०२०)