केरळच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाकडून पत्नीला तोंडी तलाक
गुन्हा नोंदवण्याची अनुमती देण्यासाठी पत्नीची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे मागणी
पलक्कड (केरळ) – येथील जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश कलाम पाशा यांनी त्यांच्या पत्नीला वर्ष २०१८ मध्ये तोंडी तलाक देण्यावरून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी त्यांच्या पत्नीने केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायाधीश पाशा यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, पाशा यांचा भाऊ आणि निवृत्त न्यायाधीश बी. कमाल पाशा यांनी तिला धमकी दिली होती, ‘जर तू तलाक देण्यास नकार दिला, तर याचे परिणाम फार वाईट होतील.’
केरल: न्यायाधीश कलाम पाशा ने अपनी बीवी को दिया तीन तलाक, सजा से बचने के लिए तारीख में की हेरफेर#Kerala https://t.co/xRkUmfSMNJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 12, 2021
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार कोणत्याही न्यायाधिशाच्या विरोधात गुन्हा नोंद करायचा असेल, तर संबंधित न्यायालयच्या मुख्य न्यायाधिशांची अनुमती घेणे आवश्यक आहे.