‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे दिलेल्या निवेदनांना सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून हिंदु संस्कृतीच्या पुरस्कारासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
निपाणी येथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन
निपाणी (कर्नाटक) – ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निपाणी येथे तहसीलदारांना दिलेले निवेदन शिरस्तेदार मृत्यूंजय ढंगी यांनी स्वीकारले. या वेळी श्रीराम सेनेचे जिल्हा कार्यवाह श्री. बसवराव कल्याणी आणि श्री. राजू कोपार्डे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिनंदन भोसले, बबन निर्मळे, अमोल चेंडके, उदय पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. संकेश्वर येथे पोलीस ठाण्यात निवेदन देतांना हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. समीर पाटील, भाजपचे श्री. जयप्रकाश सावंत, हिंदुत्वनिष्ठ श्री. निलकंठ लब्बी उपस्थित होते.
नंदुरबार येथे शिक्षणाधिकार्यांना निवेदन
नंदुरबार – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खंदारे, स्थानिक अन्वेषण विभागाचे विजय सिंह राजपूत आणि शिक्षणाधिकारी यांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी या मागणीचे निवेदन स्वीकारले. निवेदन देण्यासाठी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नागपूर येथे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
नागपूर – १४ फेब्रुवारीला शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्या समाजकंटकांवर कारवाई करावी. प्राचार्यांची बैठक घेऊन निर्देश द्यावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती, करणी सेना आणि उपस्थित हिंदुत्वानिष्ठ यांद्वारे उपजिल्हाधिकारी वीरेंद्र खजान्जी यांना देण्यात आले. याच समवेत ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करून त्यास प्रोत्साहन द्यावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी समितीचे अतुल अर्वेन्ला, श्री. अभिजीत पोलके, करणी सेनेचे श्री. विश्वजीत सिंह बैस, श्री. शौनक देशमुख, श्री. श्रेयस दाते, श्री. जयसिंह बैस, श्री. इशांत कनोजिया, तसेच अधिवक्ता श्री. चिंतामणी देशपांडे हे उपस्थित होते.
यवतमाळ येथे प्रशासन, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर !
यवतमाळ, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाइन डे’चे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद दुबे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मनोज औदार्य, योग वेदांत सेवा समितीचे श्री. गणेश साठे, साप्ताहिक स्वराज्यगर्जनाचे संपादक श्री. क्रांती अलोने, सनातन संस्थेच्या सौ. कल्पना राऊत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय फोकमारे, प्रशांत सोळंके, राम धारने, ऋषी बोरकर उपस्थित होते.
विटा आणि जत येथे (जिल्हा सांगली) येथे प्रशासन अन् शाळा यांना निवेदन !
विटा (जिल्हा सांगली) – समितीच्या वतीने विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना निवेदन देण्यात आले. ‘जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पोच करतो’, असे त्यांनी सांगितले. हे निवेदन ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यापक कॉलेजच्या प्राचार्या सौ. मेधा गुळवणी, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, सौ. इंदिराबाई भिडे कन्या प्रशाला येथेही देण्यात आले.
जत (जिल्हा सांगली) – येथे राजे रामराय महाविद्यालयात हे निवेदन शिक्षक म.हु. केंचनवर यांनी स्वीकारले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांनाही निवेदन देण्यात आले.
‘व्हॅलेंटाईन डे’चे निवेदन स्वीकारल्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत गटशिक्षणाधिकार्यांचे शिक्षकांच्या ‘व्हॉट्सअॅप’ गटात निवेदन पोस्ट करण्याचे आश्वासन !
कोल्हापूर – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी.सी. गुरव यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर गटशिक्षणाधिकार्यांनी तात्काळ प्रतिसाद देत समितीचे निवेदन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या व्हॉट्सअॅपच्या गटात पाठवतो, असे सांगितले. याच आशयाचे निवेदन आजरा येथे नायब तहसीलदार डी.डी. कोळी आणि आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. सुभाष दोरुगडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंदराव साठे, शंकर पेटकर, प्रवीण पाटील उपस्थित होते.
जयसिंगपूर (कोल्हापूर) – येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना निवेदन देण्यात आले.
शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर निवेदन मुलांना वाचून दाखवतो ! – प्राचार्य कांतीलाल खुरंगे, मुधोजी हायस्कूल, फलटण
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा
फलटण (जिल्हा सातारा) – येथील मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य कांतीलाल खुरंगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कांतीलाल खुरंगे म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती हे चांगले कार्य करत आहे. मी हे निवेदन शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुलांना वाचून दाखवतो.
येथील पोलीस निरीक्षक किंद्रे यांना, तसेच येथील तहसील कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथेही निवेदन देण्यात आले. येथील ४ शाळा आणि ५ महाविद्यालयांतही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर – येथील उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, जनसंपर्क अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री धनंजय बोकडे, सूरज करडे उपस्थित होते.
लातूर – येथील जिल्हाधिकारी विजय ढगे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. श्री. पांडुरंग कोठावळे, संतोष पाटील, कैलाश यादव, चंद्रशेखर धमगुंडे, बालाजी मोरे यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे आणि पोलीस ठाणे येथील आर्.एस्. मुलाणी यांना निवेदन देण्यात आले.
धाराशिव – येथील नायब तहसीलदार कुलदीप कुलकर्णी यांना देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री भगवान श्रीनाम, लक्ष्मण काकडे, संतोष पिंपळे, अभिषेक कदम, आदित्य वीर आदी उपस्थित होते.
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – येथील उपविभागीय अधिकारी श्री. उदय सिंह भोसले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन प्रभातच्या वाचक सौ. स्मिता महाजन, सनातन संस्थेच्या सौ. सुमिता रत्नपारखी आणि कु. कांचन वाले आदी उपस्थित होते.