पुण्यातील इलेक्ट्रिक बाजारातील बनावट साहित्यावर पोलिसांकडून कारवाई !
बनावट साहित्य विकून जनतेची फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !
पुणे – इलेक्ट्रिक बाजारातील एका व्यावसायिकाकडून नामांकित आस्थापनाच्या, तसेच परवाना रहित केलेल्या आस्थापनांच्या नावाने बनावट वायरची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार गुन्हे शाखा विभाग ४ चे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी वायरची विक्री करणारा रमेशकुमार सुतार याला अटक केली आहे. या कारवाईत २ कोटी रुपयांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. गेल्या ४ वर्षांपासून बनावट वायर सिद्ध करून त्याची विक्री चालू असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.