चाकणच्या शासकीय रुग्णालयात मद्यपी तरुणांनी केली आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक यांच्यासह पोलिसाला मारहाण !
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?
चाकण (जि. पुणे) – मद्य पिऊन आलेल्या २ तरुणांनी येथील चाकण ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक, तसेच पोलीस कर्मचारी यांना मारहाण केल्याची घटना ८ फेब्रुवारीच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
Police have arrested the two men, both of whom work in the engineering department of a private company.https://t.co/9ZxX4in8do
— Express PUNE (@ExpressPune) February 10, 2021
या प्रकरणी डॉ. विनायक मोहोळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी २ तरुणांना कह्यात घेतले आहे. दोन्ही मद्यपी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.